पंचकर्म आता का करावे ?

20 Jan 2026 15:48:49
 
PanchKarma
मकर संक्रांतीपासून ऋतू परिवर्तनास सुरुवात होते. या काळात सूर्याचे तापमान वाढू लागते आणि उन्हाचा तडका अधिक जाणवू लागतो. त्यामुळे शरीरातील दोषांचे संतुलन बिघडू नये व आगामी उष्ण ऋतूसाठी शरीर सक्षम राहावे यासाठी पंचकर्म करणे अत्यंत उपयुक्त ठरते. पंचकर्मामुळे शरीरातील साचलेले विषद्रव्य बाहेर पडतात, पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. येणाऱ्या उष्णतेला तोंड देण्यासाठी शरीर व मन दोन्ही स्तरांवर तयारी करण्याच्या दृष्टीने मकर संक्रांतीचा काळ पंचकर्मासाठी योग्य मानला जातो.
 
 मग पंचकर्मात काय करावे?
तर संपूर्ण शरीराची अभ्यंग (तेलमालिश) व स्वेदन (वाफ/उष्ण उपचार) करणे उपयुक्त ठरते. यामुळे शरीरातील कोरडेपणा कमी होतो, स्निग्धता वाढते आणि त्वचा व स्नायू लवचिक राहतात. अभ्यंग-स्वेदनामुळे शरीर उन्हाच्या तडक्याला सहज तोंड देऊ शकते, उष्णतेचा त्रास कमी जाणवतो. तसेच सांधे, स्नायू व मज्जासंस्था मजबूत राहतात, शरीराची झीज होत नाही आणि एकूणच बल व ताजेपणा टिकून राहतो. नियमितपणे केल्यास शरीर सशक्त, संतुलित व निरोगी राहण्यास मदत होते.
 
 
डॉ. विद्या लांजेवार
चक्रपाणी पंचकर्म हॉस्पिटल
7796187169
Powered By Sangraha 9.0