Achievement

Yogsanskar    01-Sep-2026
Total Views |

img

*श्रीमती सुरेखाकाकू गुरु* आणि *श्री सुरेशकाका गुरु* यांच्या मंगलमय भेटीचा योग मला माझे *योगशिक्षक श्री मुकुल गुरु सर* यांच्या कृपेने लाभला.
या दोन्ही मान्यवरांनी त्यांच्या आयुष्यातील अमूल्य अनुभव, साधनेचा प्रवास आणि योग संस्कार विषयीचे विचार अत्यंत आत्मीयतेने व्यक्त केले. *योग संस्कार संस्थापक मंडळाचे संचालक* म्हणून त्यांनी केलेले कार्य, त्याग आणि समर्पण जाणून घेण्याची संधी मला मिळाली, हे माझे परम भाग्यच म्हणावे लागेल.
त्यांच्या जीवनप्रवासातून मला *निष्ठा, सातत्य, सेवा, त्याग आणि गुरुतत्त्वावरील अखंड श्रद्धेचे महत्त्व* प्रकर्षाने जाणवले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे आणि अनुभवांमुळे योग संस्कारावरील माझा विश्वास अधिक दृढ झाला. तसेच या महान उपक्रमाची व्यापकता, समाजहितकारी दृष्टी आणि मानवकल्याणासाठीचे योगदान नव्याने अनुभवता आले.
त्यांचे अनुभव शब्दबद्ध करण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. या अनुभवांमधून श्रोते, वाचक आणि साधकांना प्रेरणा, दिशा व साधनेसाठी नवीन ऊर्जा प्राप्त होवो, हीच सदिच्छा. :bouquet:
– आपला,
गरुड कीर्तिराज 
जय गुरुदेव!